कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने रुग्णाचे निदान लवकर होण्यासाठी आता अॅण्टीजन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. याद्वारे आज शहरातील विविध ठिकाणी एकूण १८५१ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी ६५ जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले.
आरोग्य विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी नागरिकांची अॅण्टीजन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. यामध्ये हर्सुल जेल क्वार्टर येथे २३४ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली त्यापैकी १९ पॉझिटिव्ह आले तर एकनाथ नगर येथे ७३ पैकी पाच पॉझिटिव्ह, विशाल नगरमध्ये १११ पैकी पाच पॉझिटिव्ह, एन-फोर येथील १०२ पैकी तीन पॉझिटिव्ह, विठ्ठल नगरमध्ये ६४ पैकी एक पॉझिटिव्ह तर गांधी नगरमध्ये ११७ पैकी आठ, नक्षत्र वाडीत १०० पैकी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर वसंत विहार मध्ये २२२ तपासणी केली आणि कामगारनगरमध्ये पन्नास जणांची तपासणी केली मात्र या दोन्ही ठिकाणी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. या ठिकाणांसह शहरातील चेक पॉइंटवरही अॅण्टीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये दौलताबाद टि पॉइंटवर ६१ जणांचे स्वॅब तपासण्यात आले. त्यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आले तर झाल्टा फाटा येथे १९७ पैकी आठ , नगरनाका येथे १७७ पैकी दोन , चिकलठाणा येथे १७० पैकी एक, हर्सुल टि पॉइंट येथे ११८ पैकी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर कांचनवाडी चेक पॉइंटवरील तपासणी केलेल्या ५५ पैकी कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आले नाही. या विविध ठिकाणी एकूण १८५१ जणांचे स्वॅब तपासण्यात आले.











